
राज्यात कोरोना व्हायरसने
बाधीत रुग्णांची वाढती संख्या
लक्षात घेता आता जनतेच्या
सुरक्षेसाठी चंद्रपूर जिल्हा
प्रशासनाला काही कठोर निर्णय
घेण्याचे निर्देश दिले असून उद्या
पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सिमा
बंद करून एसटी बस, खासगी
ट्रव्हल्स, टॅक्सी आदी वाहनांना
जिल्ह्यात प्रवेशबंदी घातली जाणार
असल्याची माहिती राज्याचे
आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा
चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय
वडेट्टीवार यांनी आज दि.२३
मार्चला जिल्हाधिकारी
कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना
सांगीतले.
एक दिवस जनता कफ्र्युमध्ये
जिल्हावासीयांनी सहभाग
दर्शविला त्याबद्दल त्यांनी जनतेचे
आभार मानले मात्र आता
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र
लॉकडाऊन केला असल्यामुळे
येत्या ३१ मार्चपर्यंत जनतेनी
घराबाहेर पडू नये, स्वताची
काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी
असे आवाहन वडेट्टीवार यांनी
केले. आज पालकमंत्री विजय
वडेट्टीवार यांनी जिल्हा आपत्ती
व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात
सर्व प्रमूख अधिकाNयांच्या बैठका
घेतल्या. जिल्ह्यात सध्या स्थितीत
एकही कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण
नाही मात्र होम कॉरंन्टाईन
करण्यात आलेली अनेक जण
आहे. त्यातील जवळपास ४२
लोकांना प्रीझेंटीव्ह म्हणून प्रशासन
त्यांना ताब्यात घेऊन चंद्रपुरातील
वनअकादमी येथील होस्टेलमध्ये
प्रत्येकांना स्वतंत्र खोलीत
विलगीकरण करून ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे.यात चंद्रपूर
महानगर पालिका क्षेत्रातील ३५
, ग्रामिण भागातील ४ तर
तालुकास्तरावरील ३ जणांचा
समावेश आहे. चंद्रपूर येथील
आयएमए या वैद्यकीय
संघटनांसोबत प्रशासनाने मिटींग
घेतली आहे. कोरोना व्हायरस ही
आता राष्ट्रीय आपत्ती आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे
नागरिकांनी पालन करावे,
प्रशासनाचा निर्णय हा जनतेच्याच
सुरक्षेसाठी आहे. जनतेला
वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे
प्रशासनाच्या निर्णयांना कोणीही
सक्ती समजू नये असे आवाहन
करीत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे
काम अभिनंदनीय असे आहे अशा
शब्दात वडेट्टीवार यांन
प्रशासनाच्या कार्यावर समाधान
व्यक्त केल



