चंद्रपुर

२१ दिवस लॉकडाउन; जनजीवन ठप्प

चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील २० मजूर
तेलंगानात अडकले असून, या मजूरांना तेलंगणातील गावकNयांनी
गावाबाहेर काढल्याने हे मजूर अडचणीत आले आहे. या मजूरांना
आपल्या गावापर्यंत प्रशासनाने सुखरूप आणावे यासाठी आम आदमी
पार्टीच्या नेत्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी महाराष्ट्र आणि
तेलंगाना प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहे. पवनपार, गुंजेवाही,
खैरी, तांबेगडी मेंढा येथील २० मजूर असून, ते तेलंगानातील
कोट्टागुड्डम जिल्हयातील करसलबोड येथे मिरची तोडण्यासाठी हे
मजूर स्थलांतरीत झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर,
मिरची तोडण्या करीता गेलेल्या या स्थलांतरीत मजूरांना
करसलबोडच्या गावकNयांनी गावाबाहेर काढले. परत येण्यासाठी
कोणतेही साधन नसल्यांने, हे मजूर शेतात आश्रयाला आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.