विदर्भ

जिल्हाभरात जनता कफ्र्यूत कडकडीत बंद

अकोला दि. २२ । कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुकारलेल्या एकदिवसीय जनता कफ्र्यूला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जगभरात थैमान घालणाèया कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशभरात स्वयंस्फूर्तीने ‘जनता कफ्र्यू‘ पुकारण्याचे आवाहन केले होते. सोबतच २२ ते २४ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला लॉकडाऊनचा प्रभाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिसून आला. अकोल्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट असून, तुरळक अपवाद वगळता वाहनांची कोणतीही वर्दळ दिसली नाही.

शहरातील अत्यावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाची शहरातील व्यावसायिकांनी काटेकोर अंमलबजावणी केली. रेल्वेस्थानक, बसस्थानकावरही प्रवाशांची कोणतीही गर्दी नव्हती. ग्रामीण भागाची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद होती. पेट्रोलपंप सुरू असले, तरी त्या ठिकाणी वाहनधारकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याची सुरुवात रविवारच्या जनता कफ्र्यूपासूनच झाल्याचे चित्र अकोल्यात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नसल्याने सगळीकडे शांतता पसरल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने शहरात जनता कफ्र्यू शतप्रतिशत यशस्वी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.