

युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर आणि युथ स्ट्रगल ग्रुप खैरगाव चांदसूर्ला येथे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी शमशेर शुभेदार नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर यांचा मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच देवरावजी ताजने यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष सरपंच माधुरी सागोरे, प्रमुख पाहुणे उपसरपंच अनिल डोंगरे, ग्रा.प.स.अंकित ढेगारें, संगीता हेलवडे,माजी पंचायत समिती सदस्य पंकज ढेगारे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन नागरकर विशेष अतिथी पो.पा.शंकरजी ताजने तं.अ. अरुण दैवलकर, जि.प.शाळा मुख्याध्यापक सुनिल मामीडवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिभा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व गुरुदास भोयर.समाजिक कार्यकर्ते भास्कर तराळे भद्रावती उपस्थित होते नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी व उपसरपंच ताडाळी निकीलेश चामरे यांनी उपस्थित खेळाडू व गावकरी यांना नेहरू युवा केंद्राची कार्याची भूमिका स्पष्ट करत युवकांसाठी सर्वांगीण विकास आमचे ध्येय आणि युवासहभागातू समाजाचा विकास आमचे लक्ष्य असे सांगितले आणि खेळाडूंना शुभेछा दिल्या .सदर क्रीडा स्पर्धेत कबड्डी, व्हॉलीबॉल,खो खो,बॅट मिंटन आणि.दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हेमंत सूर्यवंशी यांनी रेफरी म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री झोडे यांनी केले व प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र तालुका प्रतिनिधी प्रगती मार्कंडवार यांनी केले व आभार प्रदर्शन प्रणाली धांडे यांनी केले युथ स्ट्रगल ग्रुप खैरगाव चांदसूर्ला अध्यक्ष प्रतिक मसराम उपाध्यक्ष सूरज परशिवे सचिव उमेश लाखे सदस्य- कुणाल क्षीरसागर, आयुष रायपुरे,वृषभ घाटे,सुमित परशिवे, नयन धुर्वे,नागेश घरत, अभिजीत मडावी,साहिल पारशिवे, कुणाल अलोने, शैलेश जाधव,तन्मय वाढई, उज्वला नेवारे, भाग्यश्री झोडे, काजल मसराम,प्रणाली धांडे,पुनम वाढई,वैष्णवी क्षिरसागर,गुंजन जुगनाके,खुशबू जुगनाके,प्राची हेलवडे,दीक्षा वाघ, या सर्वांचा मदतीने आणि सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला….


