![]()
चंद्रपूर :- गत 9 वर्षात औद्योगिक विकासात देशाने मोठी झेप घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा कार्यकाळ विकासाला वाहून घेणारा असल्याने उत्पादन लक्ष्यांक, रोजगार निर्मीती या बाबींवर भर दिला जात आहे. सरकारी, निमसरकारी व खासगी उद्योगांमध्ये उत्पादकते बरोबरच रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत नव्या औद्योगिक धोरणांमुळे उद्योग क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आश्वासक असल्याने या क्षेत्रात नवनवीन उद्योजक पुढे येत देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न होत आहे केंद्र सरकारचे धोरण उद्योग, व्यवसाय संरक्षक असल्याने औद्योगिक क्रांतिच्या दिशेने देशाची वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने, कामगार व रोजगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.
वेकोलि क्षेत्रीय कार्यालय, वणी उर्जाग्राम (ताडाळी) चंद्रपूर येथे मोदी / 9 अंतर्गत आयोजित केेंद्र सरकारी रोजगार मेळा अंतर्गत 75 वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरी आदेश वितरण तथा लाभार्थी संमेलनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजक हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी वणी क्षेत्राचे आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. संजय कुंटे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजिवकुमार, क्षेत्रीय महाप्रबंधक आभा सिंह, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, विजय पिदूरकर, नामदेव डाहूले, राजू घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, पवन एकरे यांची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात भूपेंद्र यादव यांनी रोजगार प्राप्त सर्व भूमिपुत्रांना शुभेच्छा देतांनाच आपले कर्तव्य समजून उद्योगाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. देशाप्रतीचे आपले ऋण समर्पित भावनेने फेडावे, पर्यावरणास न्याय देण्याची उद्योगाबरोबरच आपली जबाबदारी असल्याची भावना नेहमी जागृत ठेवावी असे सांगतांनाच यापुर्वी पर्यावरणीयविषयक मान्यतेकरिता जवळपास 2 वर्षाहुन अधिक कालावधी लागायाचा आता केवळ 75 दिवसात पर्यावरणीय मान्यता दिली जाते. सर्व बाबींची पुर्तता एकाचवेळी व्हावी अशी व्यवस्था सरकारने केली आहे. वेकोलि प्रदुषण 76 टक्के पेक्षा अधिक चिन्हीत असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा कसोशिने प्रयत्न करावा अशी सूचना केली. कामगारांनी औद्योगिक प्रगतीकरीता कर्तव्य आधारीत कार्यावर भर देण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी केले.



