चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

केंद्राच्या विकासाभिमुख धोरणामुळेच कोळशाचे बंपर उत्पादन – हंसराज अहीर

आपल्या संबोधनात हंसराज अहीर यांनी सांगितले की, मा. प्रधानमंत्र्यांनी एम्पलायमेंट प्लेसमेंट  आधारीत कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असल्याने आज 75 भूमीपुत्रांना त्यांच्या हक्काचा रोजगार दिला जातोय 2015 पासून सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केल्याने नोकऱ्या  उपलब्ध होत आहेत. वेकोलि प्रकल्पग्रस्तांना 120 करोड ऐवजी 2,300 करोड आर्थिक मोबदला व  प्रकल्पग्रस्तांना 11 हजार नोकऱ्या  मिळाल्या आहेत. शेतकरी बांधवांच्या त्यागाचा हा सन्मान आहे. सरकारच्या विधायक धोरणामुळे कोळश्याचे उत्पादन वाढले आहे. 700 मिलीयन मे.टन पर्यंत उत्पादन होत आहे.
वेकोलि प्रकल्पामधील ओबीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे सांगत हंसराज अहीर यांनी स्थानिकांवर रोजगारविषयी होत असलेल्या अन्यायाबाबत चिंता व्यक्त करीत ओबी कंपन्या राज्य शासनाच्या 80ः20 धोरणाला हरताळ फासत श्रमीकांची भर्ती करीत आहेत. या कंपन्यांमध्ये बाहेरील कामगार स्थानिकांपेक्षा 3 पट अधिक असल्याने स्थानिकांवर अन्याय होत आहे. अत्यल्प मजुरी देत आर्थिक लूट सूरु आहे. वेकोलि अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारी धोरणावर अंमल व्हावा जे भुमीहिन आहेत, शेतमजुर आहेत त्यांना प्रबंधनांने ट्रेनिंग द्यावी. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना चंद्रपूर, यवतमाळ क्षेत्रात रोजगार उपल्बध होईल असा प्रयत्न करु उच्चशिक्षीत प्रकल्पग्रस्तांना सन्मानपूर्वक पद मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन अहीर यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.