चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बल्लारपूरात आत्महत्येचे सत्र सुरूच : विद्यानगर वॉर्डात 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात नुकतीच काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातच ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा विद्यानगर वार्डातीलच पंचशील चौक परिसरातील अनिल नारायण देवगडे वय-20 वर्ष, यांनी आपले राहते घरी मंगळवार ला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे अनिल हा मोलमजुरीचे काम करायचा मात्र या आत्महत्येचे कारण अजून समजले नाही या घटनेची माहिती कळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.