चंद्रपुर

*अवैध दारुच्या वाढत्या विक्रिवर आ. जोरगेवार यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट, अवैध दारु विक्री बंद करण्याचे निर्देश*

चंद्रपूर (का.प्र.): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात दाखल होणा-या सिमा बंद करण्यात आल्या आहे. अशात नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पासेस चि गरज आहे. हे पास काढतांनाही चांगलीच दमछाट करावी लागत आहे. मात्र हा नियम दारु तस्करांसाठी नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा दाखल होणा-या पॉइंट वरती पोलिस बंदोबस्त असतांना जिल्हात अवैध दारु दाखल होतेच कशी असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून अवैध दारु विक्रीवर पूर्णतः आळा घालण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारुविक्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेतली असून या बाबत चर्चा केली. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेवून अवैध दारु विक्रीवर प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सध्या चंद्रपूरात सुरु असलेल्या अैवध दारु व्रिकी बाबत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात प्रवेश करणा-या सिमेवर पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात करण्यात आला आहे. येथील पोलिस कर्मचा-यांकडून येथून येणा-या प्रत्येक वाहणांची तपासणी केल्या जाते एकादयाकडे पोलिस विभागाची परवाणगी नसल्यास त्याला सिमेवरच थांबविल्या जात. असा पोलिसांचा दावा आहे. मात्र हा नियम दारु तस्करांसाठी नाही का असा प्रश्नही यावेळी आ. जोरगेवार यांनी केला. सध्या सक्रिय दारुविक्रेर्त्यांबाबत पोलिसांना माहिती आहे. असे असातांनाही कारवाई होत नसल्याने नागरिकांध्ये पोलिस प्रशासनाच्या भुमीकेवर शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे आता दारु विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्यांवर कारवाई करत अवैध दारुविक्री पूर्णतः बंद करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.