चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. चंद्रपूर जिल्हा देशभरात ग्रीन झोन मध्ये आला आहे. मात्र अद्यापही धोका टळला नसून आरोग्य विभाग प्रत्येक नागरिकांची तपासणी करत आहे. सोबतच नवीन येणाèया प्रत्येकाला तपासणी करूनच आतमध्ये घेतले जात आहे. मात्र यापुढे चंद्रपूरमध्ये कोणी येऊ नये व चंद्रपूर मधून कोणीही बाहेर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हा प्रशासनाने दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधतांना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
आपला जिल्हा ग्रीनझोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्कर कडून येणाèया आकडेवाडीरीमधून, महानगरपालिका व पोलिसांकडून येणाèया आकडेवारीतून अनेक जण चंद्रपूरमध्ये हे नव्याने दाखल होत असल्याचे दिसून येते. यापुढे शासकीय कर्मचाèयांसह अन्य कोणालाही अप-डाऊनची परवानगी नाही. चंद्रपूरमध्ये कोणालाही येता येणार नाही व कोणालाही बाहेर पडता येणार नाही. अपवादात्मक स्थितीमध्ये पोलिसांची परवानगी घेऊनच शहरात तपासणीअंती दाखल होता येईल. प्रत्येकाची तपासणी आवश्यक आहे. नव्याने येणाèया आजारी व्यक्तीला कॉरेन्टाइन करण्याची थेट कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.चंद्रपूर शहरांमध्ये अतिशय उत्तम अशी नाकेबंदी आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शहरातील अनेक छोटे रस्ते बंद करण्यात आले आहे. ही नागरिकांची गैरसोय नसून कोरोना सारख्या महामारी सोबत लढण्यासाठी उचलण्यात आलेले सक्त पावले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. येणाèया भाजीपाल्याचे टड्ढक सुद्धा निर्जंतुकीकरण करूनच शहरात घेण्यात येत आहे. प्रत्येक नाक्यावर काळजी घेणे आवश्यक असून जिल्ह्याच्या प्रमुख ५६ ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास जागता पहारा आहे.
मात्र अशावेळी सीमावर्ती गावांमधील नागरिकांनी प्रशासनाचे कान व डोळे होणे आवश्यक आहे. राजुरा उपविभागीय अधिकाèयांनी यासंदर्भात अतिशय कडक कारवाई केली असून लगतच्या तेलंगाना मधून येणाèया नागरिकांना मज्जाव केला आहे. काहींना काल सीमेवरून परत पाठविण्यात आले आहे. यापुढेही पोलिसांची परवानगी असेल तरच आतमध्ये घेतल्या जाईल. या जिल्ह्यात असणाèया सर्व बाहेरच्या नागरिकांची आम्ही काळजी घेत आहोत. त्याप्रमाणे सीमेलगतच्या असिफाबाद, आदीलाबाद, यवतमाळ ,नागपूर याठिकाणी अडकल्याची देखील काळजी तेथे घेतली जात आहे. त्यामुळे ३ मे पर्यंत कोणीही येण्याची व आतून बाहेर जाण्याची हिम्मत करू नये, असे स्पष्ट केले आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवारयांच्या सूचनेनुसार कुंभार समाजाला त्यांची नियमित पारंपारिक कामे करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील पशुखाद्य विक्री केंद्र उघडण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे. शेतीच्या नियमित कामाला कोणतेही बंधन टाकण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तू दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत कायम उघडे असतील.
२० तारखे नंतर रेशन दुकानांमधून किराणा वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. सध्या रेशन दुकानातून २ व ३ रुपये दराने गहू व तांदूळ मिळत आहेत. याशिवाय प्रत्येक मानसी ५ किलो तांदूळ मोफत मिळत आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बँका सुरळीत सुरू असून नागरिकांनी आपल्या गावातील सेतू केंद्रांमध्ये बँकेचे व्यवहार आधार कार्ड दाखवून करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. डीजीपे सुविधाद्वारे सेतू केंद्रातून व पोस्ट कार्यालयातून देखील बँकेचे व्यवहार नागरिकांना यापुढे करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाणे गरजेचे नसून सर्व बँका देखील सुरु ठेवण्यात आलेल्या आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ६७ नागरिकांची नोंद करण्यात आली.
५९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३९ नमुनेही निगेटिव्ह निघाले आहेत. २० नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २७ हजार ६६२ आहे. यापैकी २ हजार ८५९ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २४ हजार ८०३ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ४९ आहे. नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२२५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी ०७१७२-२५१५९७, टोल फ्री क्रमांक १०७७ यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणा?्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

