चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधीताची संख्या ४८ शहरात आणखी एक पॉझिटीव्ह

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णनगर केरला कॉलनी परिसरात आज सोमवारी २५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या पंचवीस वर्षीय बाधिताला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथून चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या युवकाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. काल लक्षणे दिसायला लागल्यावर त्यांचा स्वॅब घेण्यात आला.आज अहवाल पॉझिटीव्ह आला. काल चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला होता. आज सोमवारी एक काल रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *