
चंद्रपूर(का. प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईवरून आलेल्या या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. १५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे पुढे आले आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधीत रुग्णाची संख्या ४९ झाली आहे.


