
गडचिरोली(प्रति) : काल रात्री मुलचेरा तालुक्यातील नव्याने ३ महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १० झाली. यामुळे जिल्हयात एकुण कोरोना बाधितांची संख्या ५१ झाली. तर ४० कोरोनामुक्त झालेल्यांना यापुर्वीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या १० सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघीनाही जिल्ह्यात आल्यानंतर मुलचेरा येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे वय १८, २१ व ४० वर्षे असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.



