गडचिरोली(प्रति): येथील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एसआरपीएफ मधील 72 जवान कोरोना बाधित आढळले.
पोलीस विभागातील मुंबईहून परतलेला इतर एकजण कोरोना बाधित मिळाले असून आज एकूण 73 कोरोना बाधित आढळलेले आहे. यामुळे आजचे कोरोनाबाधित – 73,आज कोरोनामुक्त-04,जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 113,सध्या सक्रिय कोरोना बाधित- 165,मृत्यू – 01एकुण बाधित – 279 अशी संख्या झाली आहे. जिल्ह्याबाहेरील आत्तापर्यंत आढळलेले व जिल्ह्यात उपचार घेत असलेले कोरोना बाधित- 51जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 330 झाली आहे.




