चंद्रपूर(का.प्र): शहरात कोरोनाच्या वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याधिकारी यांनी १७ जुलै ते २६ जुलै पर्यंत १० दिवसांचा लॉकडाऊन चंद्रपूर शहर, ऊर्जा नगर व दुर्गापूर या भागात जाहीर केला. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला मात्र विनाकारण फिरणाऱ्या ४६६ नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यावेळी ३१ लाख ६८ हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला. प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले आहे.




