चंद्रपूर (का.प्र):चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज १३२ कोरोनाचे बाधित रुग्ण मिळाले आहेत. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. १ तेलंगणा,१ बुलढाणा,१ गडचिरोलीचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित १७९९ रुग्ण आहेत यामध्ये १०८९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तर ६९६ रुग्ण उपचार घेत आहे.




