चंद्रपूर प्रतिनिधी :- तब्बल 10 वर्षापासुन विवाहित असल्याची कबुली देणाऱ्या पोलीस वसाहतील एका पोलिस कर्मचारी असलेल्या प्रमोद दुबे नामक व्यक्तीने एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप पीडित युवतीने रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला असुन आरोपी विरोधात कलम ३७६ व इतर कलमान्वये गुन्हे दखल झाले असून आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. आरोपी प्रमोद दुबे हा विवाहित असुन त्याने ही माहिती लपवून आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
चंद्रपूर येथिल पोलीस वसाहतीत वडिलांच्या घरी राहणाऱ्या प्रमोद दुबे नामक व्यक्तीने पीडित युवती सोबत मैत्री केली, नंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाची मागणी करताच तिला भूलथापा देऊन टाळाटाळ करून पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तिला बाध्य केल्या जात होते व युवती सुद्धा आपले लग्न होणार असल्याच्या अपेक्षेने त्याला साथ देत होती.
याचाच फायदा घेवून हा नराधम ठिकठिकाणी ह्या युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता ह्या कामी त्याला त्याच्या मित्रांची साथ होती.
दोघांचे एकमेकांत गुंतलेले मन आणि लग्न करण्याच्या इराद्याने मुलीने दिलेली साथ यामुळे काही महिन्यांपूर्वी ह्या संबंधातून ती तरुणी गर्भवती झाली होती परंतु त्यावेळी ह्या युवकाने तिची तब्येत बरी नसल्याने इतर औषधा सोबत गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करविला होता.
त्यानंतर सुद्धा लग्नाचे आमिष देऊन ह्या दुबेने तिच्याशी पूर्ववत शारीरिक संबंध कायम ठेवले होते. मात्र यादरम्यान युवतीने लग्नाचा हट्ट धरला असता त्याने तिच्या घरीच फुलाचे दोन हार आणुन ते एकमेकांच्या गळ्यात घालुन लग्नाचा बनाव केला व लॉक डाऊन संपल्यावर नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे आश्वासन दिले व त्या युवतीला शहरात आपण खोली करून राहू या बहाण्याने तूकूम येथील एका हॉटेलच्या खोलीत चार दिवस तिला सोबत ठेवले. ह्या दरम्यान तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, हॉटेल मधे मुक्कामाला असताना तिने त्याच्या घरी घेऊन चलण्याचा आग्रह केला असता शेवटी आरोपीने आपण 10 वर्षापासुन विवाहित असल्याचे युवतीला सांगताच मुलीला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली व तिने त्याला जॉब विचारला असता तिलाच बेदम मारहाण करून तिला शहरातील एका चौकात थांबवून स्वतः पळ काढला. संकटात सापडलेल्या ह्या मुलीने फ्रेंड्स महिला चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्ष सरिता मालु व मनसे महिला जिल्हा अध्यक्षा सुनीता गायकवाड ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्याकडे पीडित मुलींवर झालेला अत्याचार विशद केल्यानंतर रामनगर पोलिस स्टेशन येथे आरोपी प्रमोद दुबे यांच्या विरोधात कलम 376 (2)(11), 417, 323, 504, 506 इत्यादी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यात सरिता मालु, सुनीता गायकवाड, यांच्यासह रंजना नाकतोडे, अर्चना आमटे, वर्षा बोंबले इत्यादींने प्रयत्न केले.



