
विधानपरिषदेवर निवडून देण्यासाठी नागपूर विभागात घेण्यात येणाऱ्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकी दि. ३० जानेवारीला मतदान पार पडला असून. आज सकाळी ८ ते २ वाजे पर्यंत ६९. ३२ टक्केवारी मतदानाची नोंद झाली आहे. नागपूर शिक्षक मतदार संघासाठी २२ उमेदवार मैदानात आहेत. मतदार संघात जवळपास ३९ हजार ४०६ मतदार आहेत. मतदार संघात यावेळी ८०० मतदार वाढले आहे. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ७४६० मतदार आहे. यावेळी शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा हा जुनी पेंशन हाच ठेवल्याने या जुनी पेंशनभावेती प्रचाराची चक्रे फिरली. जुनी पेंशन हाच जिव्हाळ्याचा मुद्दा राहीत्याने पहील्या पसंतीक्रमाचे मत मिळविण्यात कोण बाजी मारणार हे २ फेब्रुवारी रोजी घोषित होणाऱ्या निकालाअंती कळणार आहे.




