
नागभीड पासुन अवघ्या 5 कि,मी,अंतरावर असलेले तालुक्यातील पाहार्णी येथील महीला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली आहे. मृतक महीलेचे नाव वनिता वासुदेव कुंभरे वय ५७ वर्षे आहे. मृतक महीला ही शेतावर गवत कापन्यासाठी दुपारच्या वेळेत गेली होती. गवत कापत असतांना या महीलेवर वाघाने हल्ला करुन ठार केले.घरी परत न आल्याने शेताकडे शोधाशोध करण्यात आली. तेव्हा ही घटना लक्षात आली. मृतक वनिता कुंभरे यांना पती, दोन मुले आणी एक मुलगी आहे. वन विभाग नागभीड येथील अधिकारी सुनील हजारे त्यांचे कर्मचारी पाहार्णी येथे दाखल झाले असुन मृतकाच्या कुंटुबास तातडीची मदत देण्यात आली, पुढील तपास करीत वन कर्मचारी व पोलीस स्टेशन नागभिड चे कर्मचारी करित आहेत.



