चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राजुरा शहरातील सर्व वॉर्डांमधे एकात्मिक बाल व महिला विकास अंतर्गत अंगणवाडी सुरू करावी – माजी नगरसेविका उज्वला जयपुरकर ह्यांची वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांना मागणी

सर्वत्र इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत असून मातृभाषा असलेल्या मराठीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून राज्यभाषा असलेल्या मराठीला सन्मान मिळवुन देण्यासाठी तसेच गरीब व अल्प उत्पन्न असलेल्या लोकांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळत रहावा ह्यासाठी राजुरा शहरातील सर्व वॉर्डांमधे एकात्मिक बाल व महिला विकास अंतर्गत अंगणवाडी सुरू करावी अशी आग्रही मागणी माजी नगरसेविका उज्वला जयपुरकर ह्यांनी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या राजुरा भेटीत निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे क्रॉसिंग असुन दिवसभरात जवळपास 25 रेल्वे गाड्या ह्या मार्गावरून धावत असतात, ह्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर बराच वेळपर्यंत वाहतूक कोंडी होत असुन परिसरात असलेल्या शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, एस टी बसेस, ट्रक तसेच सामान्य नागरिकांना त्रास होत असुन त्यांच्या कामाचा खोळंबा होत असतो त्यामुळे ह्या ठिकाणी अंडर पास तयार करून वाहतूक कोंडी दुर करण्यात यावी अशी आग्रही मागणी उज्वला जयपुरकर ह्यांनी राज्याचे वनमंत्री तसेच पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *