चंद्रपूर (का. प्र): शहरातील बाबुपेठ भागातील बहुतांश नागरिक सकाळी फिरण्याकरिता जुनोना रोड वर जातं असतात,जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना ताजी व शुद्ध हवा सकाळच्या सुमारास मिळते त्यासाठी नागरिक आपल्या सोयीनुसार सकाळी मॉर्निंग वॉक करायला जातात. परंतु हि मॉर्निंग वॉक कधीकधी जीवावर बेतले, अशीच एक घटना ११ जूनच्या सकाळी जुनोना रोड वर घडली. सकाळच्या सुमारास असंख्य नागरिक जुनोना रोडवर फिरत असताना अनियंत्रित हायवे ट्रक ने दोघांना धडक दिली यामध्ये ६० वर्षीय शेंडे नामक वृद्ध हा ठार झाला व अन्य १ जण गंभीर जखमी झाले. मृतक शेंडे हे बाबुपेठ येथील निवासी होते नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला गेले पण परिवारातील सदस्यांना काय माहित ते घरी अश्या अवस्थेत परतणार. सकाळच्या सुमारास या मार्गावर जडवाहनांची वाहतूक सुरु असते.
Related Articles
मनपातर्फे डेंग्यु प्रतिबंधक मोहीम मिशन मोडवर
गप्पी मासे प्रत्येक पाणी साठ्यात फवारणी व धुरळणी मोहीम सुरु – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन किटकनाशक फवारणी व धुरळणी मोहीम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात असुन […]
अज्ञात वाहनाच्या धड़केत दोन ठार , एक युवक गंभीर जख्मी
सिंदेवाही पासून 6 किमी अंतरावर सरडपार येथे एका अज्ञात वहनाच्या धड़केत एक युवक एक युवती असे दोन ठार तर एक युवक गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली.घटना आज दिनांक ९/२/२०२३ रात्रो ८:३० वाजताच्या सुमारास झाली. सिंदेवाही तालुक्यातील सरडपार या गावा लगत एका अज्ञात वाहनाने स्कूटीला धड़क दिल्याने मूल तालुक्यातील राजोली येथील कु. सेजल अनिल कुंभारे वय […]
म्युकरमायकॉसीस च्या चंद्रपूर जिल्हयातील रूग्णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. पर्यंत खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा – आ. सुधीर मुनगंटीवार
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सहा रूग्णालयात म्युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय तसेच सामान्य रूग्णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध नाहीत. अनेक रूग्ण खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्य रूग्णांना परवडणारा […]



