भद्रावती (ता.प्र.)वडिलांच्या भेटीसाठी माहेरी आलेली महिला ठार होण्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान भद्रावती तालुक्यातील मासळ (विसापूर) येथे घडली. बुधवारी सायंकाळी मेघगर्जने सह जोरदार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यावेळी मासळ (विसापूर)या गावात माहेरी आलेली अर्चना संजय चंदे (३५) नामक महिला गावाला लागूनच असलेल्या वडिलांच्या शेतात भाजीपाला आणण्याकरिता गेली असता वीज पडून ठार झाली.



