चंद्रपुर

रस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड

चंद्रपूर – कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आणले गेले आहेत. मात्र तरीही काही बहाद्दर राजरोसपणे नियम तोडतांना दिसत आहेत. अशाच एका नियम मोडणाऱ्या थुंकी बहाद्दर ऑटोचालकावर चंद्रपूर महापालिका आयुक्त राजेश मोहीते यांनी स्वतः कारवाई करून दंड ठोठावला. यापुर्वीही शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या प्रतिष्ठानांवर आयुक्तांनी प्रत्यक्ष कारवाई केली असून सार्वजनिक जागी थुकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणखी सक्त करण्याचा इशारा दिला आहे
कोरोना काळात नियमितपणे सकाळच्या सत्रात शहराची पाहणी करणाऱ्या आयुक्त राजेश मोहिते यांना एक ऑटोचालक चालत्या गाडीतुन रस्त्यावर थुंकतांना दिसला, ऑटोचालकाला थांबवत कोरोना काळात रस्त्यावर, सार्वजनीक ठिकाणी थुंकणे किती धोकादायक असु शकते याची जाणीव करून दिली असता, उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ऑटोचालकाला आयुक्तांनी तेथेच दंड ठोठावला तसेच पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची तंबी सुद्धा दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.