चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपुरात घरफोडी ,पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल

चंद्रपूर – 4 मे ला प्रगतीनगर निवासी 58 वर्षीय निभा रॉय हे कुटुंबासहित वडसा जिल्हा गडचिरोली मध्ये भेटायला गेले होते, दुसऱ्या दिवशी भाडेकरूंचा रॉय यांना फोन आला की तुमच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आहे. रॉय कुटुंब तात्काळ चंद्रपूर मध्ये पोहचले व घराच्या वस्तूंची पाहणी केली असता सोने व रोख रक्कम मिळून तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेला. Burglary चोरी गेलेल्या मुद्देमालात एक सोन्याची अंगुठी, 2 झुमके, कानातील टॉप्स, सोन्याची चैन, सोन्याचा नेकलेस याचा समावेश आहे., पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल होताच गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. Chandrapur police आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा केली असता रयतवारी चौक परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय आशिष उर्फ आशु श्रीनिवास रेड्डीमला याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली. Ramnagar police रामनगर पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला, सदरची कारवाई रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, विनोद यादव, किशोर वैरागडे, आनंद खरात, निलेश मुळे, पांडुरंग वाघमोडे, लालू यादव व विकास जुमनाके यांनी यशस्वीपणे पार पाडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *