चंद्रपुर जिल्हा

माजी प्राचार्य मदन धनकर यांचे निधन

चंद्रपुरातील अनेक संस्थांचे तसेच अनेक चळवळीचे आधारस्तंभ सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य मदनराव धनकर यांचे आज ३० जुलै २०२३ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या दिनांक ३१ जुलै २०२३ ला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा विद्यानगरी निवास्थान वरून निघेल.

*चंद्रपूरातील साहित्य रत्न हरपले – आ. जोरगेवार*

मदनराव धनकर म्हणजे चंद्रपूर च्या साहित्य क्षेत्रातील चालते बोलते ज्ञानकोश होते. त्यांच्या दुःखद निधनाने आज चंद्रपूरच नव्हे तर विदर्भातील एक अनमोल असे साहित्य रत्न हरपले आहे. ही चंद्रपूरच्या साहित्य क्षेत्रातील कधीही भरून न निघणारी अशी पोकळी असुन त्यांच्या अशा अचानक जाण्याने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे… त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना प्रदान करो हीच प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published.