चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ – आज होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी.

राज्यातील राजकीय नाट्याचा शेवट झाला असून कल नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार येणार व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी चर्चा सुरू होती.
गुवाहाटी वरून गोवा मार्गे आज एकनाथ शिंदे मुंबईत आले. आल्या आल्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला व तिथून दोघेही राजभवनावर पोहचले. राजभवनावर गेल्यानंतर एकनाथ शिंदे ह्यांनी सरकार स्थापनेचा दावा सादर केला.
राजभवनावर भर पावसात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे घोषित करताच मोठी खळबळ उडाली असुन एकही राजकीय पंडिताला स्वप्नातही वाटले नसेल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस ह्यांनी केली असून ते स्वतः मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचे त्यांनी घोषित केले.
भाजपचे स्वतःचे व समर्थन करणारे 130 आमदार असुनही भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा केला नसून 50 आमदारांचे पाठबळ असलेल्या एकनाथ शिंदे ह्यांना मुख्यमंत्री पद दिल्याने खळबळ उडाली आहे.
आज सायंकाळी 7:30 वाजता शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असुन ह्या शपथविधी मधे केवळ मुख्यमंत्री शपथ घेणार आहे हे विशेष.
साधारण शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचे स्वप्न देवेंद्र फडणवीस ह्यांनी खऱ्या अर्थाने साकार केले असल्याचे एकनाथ शिंदे ह्यांनी म्हंटले आहे. धर्मवीर आनंद दिघे ह्यांच्या मुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.