
मूल (ता.प्र.)सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणुच्या महामारीने देशातील व राज्यातील जनता भयभीत झाली असून डिसेंबर- जानेवारी महिण्यापासूनच पोटाच्या खळंगीसाठी मध्यप्रदेशातील बालाघाट वरुन हैद्राबाद येथे २४ कामगार आपल्या कुटूंबीयासोबत काम करण्यासाठी गेले होते. परंतू कोरोनाच्या भितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन संचारबंदी करण्यांत आल्याने ज्या कामासाठी गेले ते कामही बंद पडले असल्याने त्यांच्या उदरनिवहिचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि स्वतःच्या गावाची आठवण त्यांना चैन पडू देत नव्हती.
यासाठी सर्वत्र राज्यव्यापी व जिल्हास्तरावरील वाहतुक बंद असल्याने थेट हैद्राबाद वरुन बालाघाट जाण्यासाठी २४ कामगार पायीच निघाले असून काल दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी कामगार मुल तालूक्यातील दाबगाव येथे पोहचले. पंचायत समिती मुल अंतर्गत कोरोनापासून बचाव करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालूकास्तरीय जनजागृती पथक तयार करण्यात आले असून या जनजागृती पथकाचा दौरा चिरोली, सुशि, दाबगांव कडे असल्याने २४ कामगार दाबगांव येथे पायी चालत आले असल्याचे कळले.
असता या जि.पक्षेत्राचे सदस्य पृथ्वीराज अवताके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जिवन प्रधान, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी विजय जिडगीलवार आणि त्यांचे पथक यांनी त्या पायी येणाèया २४ कामगारांची विचारपूस करुन आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन त्याच्या जेवनाची सुध्दा व्यवस्था कली. व त्या कामगारांना सहारा दिला. या कामगारांसोबत पाच लहान मुलही होते. एकंदरीत पंचायत समिती मूलचे जनजागृती पथकच कामगारांच्या कामी पडले.



