चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांचे स्‍वप्‍न घेतील गगण भरारी

क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोलीला स्‍पर्धा परिक्षेचे ग्रंथ भेट

राज्‍याचे वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्‍ह्यामध्‍ये स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे जाळे पसरवित स्‍पर्धा परिक्षेमध्‍ये जिल्‍ह्यातील यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा टक्‍का वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीकोणाने सातत्‍याने प्रयत्‍न सुरू आहे. याचाच एक भाग म्‍हणून जिल्‍ह्यातील वाचनालयांना स्‍पर्धा परिक्षेची पुस्‍तके भेट दिली जातात. या उपक्रमाअंतर्गत क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोली ता. मुल स्‍पर्धा परिक्षेची पुस्‍तके भेट देण्‍यात आली. दि. २६ ऑगस्‍ट २०२३ रोजी गिरणार चौकातील भाजपा कार्यालयामध्‍ये क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोली ता. मुल जि. चंद्रपूरचे अध्‍यक्ष संतोष अलोणे यांना भाजपा उपाध्‍यक्ष महानगर सुरज पेदुलवार व मध्‍य मंडळ अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार यांच्‍या शुभहस्‍ते स्‍पर्धा परिक्षेचे ग्रंथ वितरीत करण्‍यात आले. यावेळी सुरज पेदुलवार म्‍हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना गगण भरारी घेण्‍याकरिता राज्‍याचे नेते सुधीर मुनगंटीवार कायम सहकार्य करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात कष्‍ट करण्‍याची जिद्द आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांची पुर्तता करण्‍याकरिता भारतीय जनता पार्टी कायमच सोबत आहे. यावेळी संतोष अलोणे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published.