चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून महिलेला केले ठार

 

चंद्रपुर :- ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून बळी घेतल्याची घटना घडली, रुपाली रामचंद्र म्हस्के, वय 39 वर्ष, रा.हळदा असे मृतक महिलेचे नाव आहे. नियमितपणे शेतात धान पिक असल्याने शेतकामाकरिता रुपाली मस्के शेतकाम करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. हि घटना 20/10/2022 दुपारी 2 वाजता घडली. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल होत, वनविभाग व पोलिसांना माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *