चंद्रपुर

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार शनीवारपासून नागपूर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि १९ जून : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री दि. २० ते २४ जून पर्यंत नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.
शनिवार दिनांक २०जून रोजी सकाळी नागपूर येथून ८.३०ला ते चिमूर कडे प्रयाण करतील. चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयात सकाळी १० वाजता ते पोहोचणार आहेत. चिमूर येथून सकाळी १०.३० वाजता सिंदेवाई तालुक्यातील रत्नापूर कडे प्रयाण करतील. रत्नापूर या ठिकाणावरून सव्वाअकरा वाजता जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे यांच्याकडे सांत्वनपर भेट देतील. सकाळी सिंदेवाही येथे १२ वाजता कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा संदर्भात अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहेत. दुपारी २ ते ६ पर्यंत सिंदेवाही शासकीय विश्रामगृहावर राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ब्रह्मपुरी विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत. रविवारी सकाळी विश्रामगृहावर ब्रह्मपुरी येथे कोविड संदर्भातील तालुका स्तरीय आढावा ते घेणार आहेत. दुपारी २.३० नंतर कॉग्रेस तथा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत.
सायंकाळी ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीला ते प्रयाण करतील. गडचिरोलीच्या शासकीय विश्रामगृहावर रविवारी ते मुक्काम करणार आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा ते घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता आदिवासी विकास प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. दुपारी २ते २.३० पर्यंत राखीव वेळ असून त्यानंतर दुपारी अडीच नंतर आदिवासी विकास महामंडळ, मार्केटिंग फेडरेशन, अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक गडचिरोली येथे घेणार आहेत. सोमवारी दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
मंगळवारी २३ जून रोजी गडचिरोली वरून त्यांचे सकाळी तहसील कार्यालय सावली येथे साडेदहा वाजता आगमन होणार आहे. सावली येथील अधिकार्‍यांसोबत कोरोना उपाययोजना आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर सावली येथील विश्रामगृहावर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व अभ्यागतांसोबत भेटी व चर्चेचा कार्यक्रम ठेवला आहे. दुपारी अडीच वाजता ते सावली येथून चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत. दुपारी ३.३० वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे कोरोना संदर्भातील विकासकामांचा आढावा नियोजन भवन चंद्रपूर येथे घेणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री हिराई विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असून बुधवार दिनांक २४ जून रोजी सकाळी नियोजन भवनमध्ये आदिवासी विकास विभाग, मार्केटिंग फेडरेशन, अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

Reply, Reply all or Forward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *