चंद्रपुर

ना.विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 2.18 कोटींची प्रयोगशाळा सुरु

चंद्रपूर, दि. 19 जून: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वॅब नमुन्यांची तपासणी जिल्ह्यामध्येच व्हावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 2.18 कोटींची प्रयोगशाळा 3 जून पासून सुरु झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वात या प्रयोगशाळेमध्ये (वायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र सुरपाम तसेच प्रशिक्षित वर्ग कार्य करीत आहे. यामध्ये एक सहाय्यक प्राध्यापक, दोन व्याख्याता, 18 तंत्रज्ञ, तीन ट्युटर, दोन लिपिक, दोन डाटा एंट्री ऑपरेटर अहोरात्र काम करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.