चंद्रपुर

वाघाची दहशत असलेल्या माना टेकडी परिसराची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

चंद्रपूर (का. प्र )शहराला लगत असलेल्या माना टेकडी येथे सध्या वाघ आणि बिबट्याची दहशत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मागील काही दिवसांमध्ये या भागात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात येथील ग्रामस्थांचे जनावरे जखमी झाले आहे. दरम्यान काल बिबट्याने बैलावर हल्ला  करुन जखमी केले. या घटणांच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसह वेकोली व वनविभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी या परिसारातील झाडी झूडपी साफ करुन लाईटची व्यवस्था करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनविभागाला दिल्यात.शहरा लगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलीचे ढिगारे आहेत. या ढिगा-यांवर झाडी झूडपी मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे जंगल निर्मीत झाले आहे. त्यामूळे आता येथे जंगली प्राण्यांनी आशय घेतला आहे. येथे अनेकांना जंगली प्राण्यांचे दर्शन घडले आहेहि बाब लक्षात घेता या ढिगा-यावरील झाडी झूडपी काढण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. तसेच या ठीकाणी मुक्तसंचार असलेल्या हिसंग जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्याही सुचना आमदार किशोर जोरगेवार वन विभागाच्या अधिका-यांना केल्यात. जखमी बैल मालकांला योग्य मोबदला देण्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वनविभागाच्या अधिका-यांना सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *