चंद्रपुर जिल्हा

मूल येथील 30 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉजीटीव्ह

गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.२५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून सदर व्यक्ती नागपूरला विमानाने आले. नागपूर वरून स्वतःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. 3 जून रोजी गृहअलगीकरणामध्ये असताना त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *