![]()
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने आयोजित आरोग्य शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन हजारो नागरिकांनी आज या शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरामध्ये सावंगी मेघे रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्याकाय येथील आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील 35 डॉक्टर आणि 55 वैद्यकीय कर्मचा-यांनी सेवा दिली.
आज सकाळी 9 वाजता या आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, मनपा उपायुक्त अशोक गराडे, मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ नेहा उत्तरवार, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, तापोष डे, शाईन शेख, कल्पना शिंदे, चंदा ईटनकर, हेरमन जोसेफ, अॅड. परमहंस यादव, दिनेश इंगळे, निलिमा वनकर, आशा देशमूख, कविता निखारे, वैशाली मद्दीवार आदींची उपस्थिती होती.
तुकूम येथील पंडित दिनदयाल शाळा येथे दोन दिवसीय आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. पूढे शहराच्या विविध ठिकाणी 9 आरोग्य शिबिरे संपन्न होणार आहे. आज आयोजित आरोग्य शिबिरामध्ये हजारो स्थानिक नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी ब्लड प्रेशर, ई.सी.जी, मँमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, मोफत औषधी व तपासणी, बाह्यरुग्ण सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, सिकल सेल चाचणी आदी तपासण्या करुन औषधोपचार करण्यात आले. यावेळी तपासणी करिता आलेल्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ई – गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आला. तसेच सदर शिबिरामध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. उद्या बुधवारी या शिबिराचा समारोप होणार असुन पूढचे शिबिर 8 जून ला बाबूपेठ येथील हिग्लाज भवानी हायस्कुल येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नागरिकांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.



