चंद्रपुर:-तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलीसानी अटक केली आहे रविवार दिनांक 2/8/20 रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर एम ई एल कंपनी रोड चंद्रपूर परीसरात येथे एक इसम हातात तलवार घेऊन फिरत आहे अशा माहितीवरून संजय नगर स्नेह मंच समोर रोड चंद्रपूर येथे पेट्रोलिंग दरम्यान आरोपी नामे बरकत सिंग दारासिंग डांगी वय 30 वर्ष रा. इंदिरानगर चंद्रपुर व मुन्ना रामू जाधव वय 19 वर्ष राहणार संजय नगर चंद्रपुर हे आपले ताब्यातील सुपर स्प्लेंडर मो.सा.क्र.एम एच ३४ए डि 2178 या मोटरसायकलवर बसून हातात बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन फिरत असता मिळून आले त्यांचे ताब्यातून व अंगझडतीत खालीलप्रमाणे मुद़देमाल बेकायदेशीररीत्या बाळगुन मिळुन आल्याने अप क्र.736 /2020 कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.१)1नग तलवार किं अं 3000/-रू २) गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किं अं 35,०००/-रू 3) 2नग मोबाईल संच कि.अं 5000रू4 ) नगदी रक्कम 11,240रू असा एकुण ,54,240/-रू चा मुद़देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुदास माहुलीकर, सपोनी संतोष दरेकर,नापोशी शंकर येरमे,नापोशी रामभाऊ राठोड,पोशी माजीद खा पठाण,पोशी निलेश मुडे यांनी केली आहे
Related Articles
ताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट .
‘माझा जन्मच ताडोबातला. बाबा वनमजूर आणि ताडोबा तलावाच्या काठावर आमची कॉलनी. जंगलात हुंदडतच मी मोठी झाले,’ शहनाझ बेग सांगत होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली ही पहिली महिला गाइड! शहनाझ एका एनजीओसाठी क्लॉडिया नावाच्या महिलेची मदतनीस म्हणून काम करत होती. क्लॉडियानं एकदा तिला विचारलं, ‘तू का नाही गाइड बनत?’ शहनाझनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘प्रयत्न करून […]
वाहतूक पोलिसांच्या हप्ते खोरी प्रकरणामुळे शहरात वाहतुकीची कोंडी कायमच
खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग – ओवरलोड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता गोंडपिपरी शहरातून जाणारा मुल-बामणी-आष्टी या आंतरराज्य महामार्गाची निर्मिती झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांना भेडसावणाऱ्या वाहतुकीची कोंडी या समस्येचे निराकरण होणार असे वाटत असतानाच शहरात वाहतूक पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग व ओवरलोड वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात […]
द्रौपदी मुर्मु यांच्या विजय जल्लोषासाठी एकवटला आदिवासी समाज
भाजपा अनु.जमाती मोर्चाचे आयोजन ; तरुणाई सोबत आ.मुनगंटीवार थिरकले. भारतीय जनता पार्टीने नेहमी सेवेला महत्व दिले.समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारण केले.आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे ही भाजपाची संकल्पना आहे.त्यामुळेच भाजपाने विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली.त्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या.त्यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा […]



