चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महेश नवमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था

महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरराशिद हुसेनसविता दंडारेकरणसिंग बैसकिशोर बोल्लमवारनामसिंह मिर्धाभाग्यश्री हांडेकल्पना शिंदेसोनाली आंबेकरतापेश डेमुन्ना जोगी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणजेच महेश नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त समाजाच्या वतीने शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. लक्ष्मी नारायन मंदिर जवळून या शोभायात्रेला सुरुवात झाली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंच जवळ पोहोचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत करत महादेव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत नमन केले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचेही वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.