चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

देशी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे हस्तगत

शांत शहर म्हणून असलेली ओळख राजुरा आता पुसत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत असुन शहरात वारंवार जप्त करण्यात येत असलेल्या घातक हत्यारांमुळे शहराची गुन्हेगारीकडे वेगाने वाटचाल होत असल्याचे चित्र दिसत असून शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दिनांक २७/१०/२०२२ रोजी राजुरा पोलिसांची चमु गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, डोक्याला पगडी बांधलेला एक व्यक्ती शहरातील न्यु इरा इंग्लीश हायस्कुलच्या जवळपास कमरेला पिस्तूल सदृश्य वस्तू अडकवून फिरत आहे. मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी सापळा रचून घेराव करून संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या लबज्योतसिंग हरदेवसिंग देवल वय १९ वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड राजुरा ह्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडून एक गावठी बनावटीचा देशी कट्टा व ४ जिवंत काडतुस,  दोघांची एकत्रित अंदाजे किंमत १२,०००/रू चा मुद्येमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरूध्द अप.क. ४३४/२०२२ कलम 3, 25 भादंवी तसेच हत्यार कायदा  सहकलम १३५ मु.पो.का अन्वये कार्यवाही करण्यात आली सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे नेतृत्वात ठाणेदार संतोष दरेकर यांचे मार्गदर्शनात पथकातील सफौ खुशाल टेकाम, पो.हवा. रविंद्र नक्कनवार, पो.हवा. किशोर तुमराम, पो. शि. महेश बोलगोडवार, पोशि, संदिप बुरडकर, पोशि. तिरूपती जाधव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.