चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी चमूना दिल्या योगा किट

योग स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ३७ स्पर्धकांची निवड

चंद्रपूर : धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक आरोग्यावर बरेच दुष्परिणाम होत आहेत. सुदृळ जीवन जगण्यासाठी दररोज योगा करणे गरजेचे आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वानी वेळ काढण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
वरोरा येथील एस. ए योगा आणि मेडिकल असोसिएशट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा (वाई) येथे होणाऱ्या योग स्पर्धेसाठी वयोगट ६-६० यातील एकूण ३७ स्पर्धेकांची निवड झाली. आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात स्पर्धकांना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते योगा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षक स्वप्नील पोहनकर, अनिकेत ढक, योगा कल्चर असोसिएशन चे सचिव पूजा देऊरकर, पालकांतर्फे शीतल मिटकर, सुखद नेवास्कर, अमृत नौकरकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.