चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे स्टेशन मास्टर चंद्रपूर यांना रेल्वेस्थानकाच्या उंची बद्दल निर्देश

डॉ. योगेश दूधपचारे यांनी दोन वर्षे केला पाठपुरावा

जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्टेशन मास्टर चंद्रपूर आणि स्टेशन  मास्टर  बल्लारशाह  यांना चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या बोर्डवरील चुकीची असलेली उंची याबद्दल आपले स्तरावरून कार्यवाही करावी व रेल्वे स्टेशनच्या  बोर्डवर योग्य ती उंची लिहावी असे निर्देश दिले आहेत. याबद्दल चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.  योगेश दूधपचारे यांनी  सतत दोन वर्षे  स्टेशन मास्टर चंद्रपूर,  स्टेशन मास्टर  बल्लारशाह, सेंट्रल रेल्वे विभागीय कार्यालय नागपूर यांच्याशी संपर्क केला. यासाठी माहितीचा अधिकार सुद्धा वापरला गेला.   चंद्रपूर रेल्वे स्थानक आणि चांदा फोर्ट  रेल्वे स्थानक या एकाच  शहरातील दोन रेल्वे स्थानकांच्या उंची मध्ये १७३. ४७  मीटर इतके उंचीचा फरक दाखविलेला आहे. चंद्रपूर शहराच्या रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर आधी १८९. ००  मीटर इतकी उंची होती,  ती अचानक ३६१. ८००  कशी झाली ?  कोणत्या पद्धतीने ती वाढविण्यात आली ?  अशी विचारणा करण्यात आली होती.  परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद रेल्वे विभागाने दिलेला नव्हता. यानंतर चंद्रपूरचे  सर्वच लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री  आणि जिल्हाधिकारी यांना तक्रार केल्यानंतर  तसेच प्रसारमाध्यमांमध्ये  चुकीची उंची सर्वत्र प्रकाश झाल्यानंतर   जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्टेशन मास्टर चंद्रपूर तसेच स्टेशन  मास्टर बल्लारशाह  यांना  चुकीची उंची दुरुस्त करावी,  आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी,  संबंधितास त्याबद्दल कळवावे,  आणि कार्यवाही  झाल्याबद्दल  आमच्याही कार्यालयास कळवावे असे निर्देश दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *