चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहन थेट वैनगंगा नदीत कोसळली

वाहनचालकाचा जागीच मृत्यू

आष्टी – गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहन थेट वैनगंगा नदीत कोसळली. यामध्ये वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री सहाच्या सुमारास घडली. अनमोल दुपारे असे मृतक वाहनचालकाचे नाव आहे. गोंडपिपरी येथून अनमोल दुपारे रा. छोटा नागपूर हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आष्टीकडे एम एच २० डिवी ३७११ क्रमांकाचे स्कार्पिओ वाहन जात होता. भरधाव असलेले वाहन आष्टीजवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून थेट नदीत कोसळले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन नदीत कोसळल्याचे कारण पुढे येत आहे. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. वेळ सायंकाळची असल्याने हे वाहन कुणाचे आहे. वाहन चालक कोण याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

वाहनात काही प्रवासी असल्याची माहिती चर्चेत होती. परंतु सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक हा एकटाच होता. अपघाताची माहिती आष्टी व गोंडपीपरी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहन नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *