
भद्रावती (ता.प्र) ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या वडाळा बू. येथे वन्यजीव संशोधन मिलिंद वाटवे यांच्या संकल्पनेतुन पर्यावरणमित्र विजय देठे यांच्या मदतीने शेतकèयांचे पुढाकारातुन तयार झालेल्या शेतकरी आधार इनाम योजनेतील सहभागी आधार इनाम योजनेतील सहभागी शेतकèयांना नाम फाउंडेशनतर्फे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यानिमित्य आयोजित केलेल्या धनादेश वितरण संमारंभाला नाम फाउंडेशनचे गणेश थोरात, हरीश इथापे, नितिन पवार, धीरज भोयर, मिqलद वाटवे, पूर्वा जोशी विजय देठे, स्मिता देठे, विठ्ठल बदखल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक पर्यावरणमित्र विजय देठे यांनी केले. त्यात त्यांनी नैसर्गिक संशोधन, लोकांचे नैसर्गिक संशोधनावरील हक्क, शेतकèयांची आर्थिक सुरक्षित करण्याचा उद्देश यावर प्रकाश टाकला.
मिqलद वाटवे यांनी शेतकरी आधार इनाम योजनेची संकल्पना उद्देश, शेतकèयांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारावरील गोळा केलेल्यामाहितीच्या आधारावरील केलेल्या माहितीच्या आधारावरील केलेला अभ्यास, त्यातुन पुढे येणारे तांत्रिक मुद्दे याबाबत माहिती दिली. सुभाष कुळमेथे, संजय नदरधने यांनी या अभ्यास प्रक्रियेतील अनुभव सांगितले. मिqलद वाटवे, पूर्वा जोशी, विठ्ठल बदखल यांचा शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्याता आला. याप्रसंगी ७१ गट सदस्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. संचालन शंकर भरडे यांनी, तर आभार सचिन केदार यांनी मानले.



