चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

शेकडो युवतींनी जाणून घेतले लव जिहादचे संकट

द केरला स्टोरी बघण्यासाठी निःशुल्क व्यवस्था

ना.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

महानगर भाजपा व भाजयुमोचे आयोजन येथील भारतीय जनता पार्टीभारतीय जनता युवा व युवती मोर्चा तर्फे द केरला स्टोरी‘ हा चित्रपट निःशुल्क प्रदर्शित करण्याची व्यवस्था सोमवारी करण्यात आल्याने महानगरातील शेकडो युवतींनी या संधीचा लाभ घेतला.लव जिहादच्या नावाखाली हिंदू व ख्रिश्चन मुलींचे होणारे धर्मांतरण,शारीरिकमानसिक शोषण व त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भयावह वास्तव बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.विशेष म्हणजे अनेक युवतींनी आपल्या आई सोबत हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट बघितला.पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आले.यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडेमहासचिव रवींद्र गुरनुलेब्रिजभूषण पाझरे, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणेभाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकरलोकसभा प्रभारी महानगर हरिश र्माअल्‍काताई आत्रामरंजना किन्‍नाकेभाजपा उपाध्‍यक्ष छबुताई वैरागडे, उपाध्यक्ष व सिनेट सदस्यगोंडवाना विद्यापीठ यश बांगडेराहुल पालमंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवारहिमांशु गादेवारसंजय पटलेगजानन भोयरसचिव मनीष पीपरेसचिन यामावारशिवम सिंहमुग्धा ताई खांडेजयश्रीताई आत्राममोनिषा ताई महतव आदींची उपस्थिती होती. लव जिहादच्या आक्रमणाला एकही युवती बळी पडू नये द केरला स्टोरी नावाचा चित्रपट नुकताच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.हा चित्रपट विशेषतः युवतींना बघता यावा व त्यांना लव जिहादचे वास्तव कळावे म्हणून निःशुल्क व्यवस्था करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा व युवतींनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे केली होती.म्हणून आयोजन करण्यात आले.लव जिहादचे अक्राळविक्राळ संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहचले आहे.मुलगीतरुणी कशी जाळ्यात अडकवली जाते संघटित धर्मांध शक्तीचे जाळे कसे असते याचे वास्तव यात आहे.केरळच नव्हे तर देशात लव जिहादची झळ पोहोचली आहे. प्रत्येक मुलीने हा चित्रपट बघावा. एकही मुलगी या आक्रमणाला बळी पडता कामा नये.अशी अपेक्षा डॉ.मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केली.लव जिहाद हा मुस्लिम धर्माचा गैरवापरच मुळात मुस्लिम धर्म हा शांतीचा संदेश देणारा आहे.असे असतांना त्याचा गैरवापर करून युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना इतर धर्माच्या विरोधात भडकविणे,त्यांचे लैंगिक शोषण करणे,त्यांना दहशतवादी होण्यास भाग पाडणे हा प्रकार अत्यन्त किळसवाणामन सुन्न करणारा व संतापजनक आहे.मुलींनी या जाळ्यात अडकू नये.केरळच्या बहिणींसोबत जे घडत आहे ते येथेही होऊ शकते.प्रत्येक भारतीयांनी हा चित्रपट बघायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *