चंद्रपुर जिल्हा

मूल न.प.तर्फे सॅनिटायझरची नगरात फवारणी

मूल (ता.प्र) जगात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असुन घराच्या बाहेर कोणीही नाही यासाठी पोलिस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. तसेच रात्रोच्या वेळेला नगर परिषदेनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद आरोग्य व स्वच्छता विभागाचे गुजरी व अत्यावश्यक असणारे किरणा, दुध, फळाचे दुकाण कोणत्या वेळेत सुरू ठेवावे याबाबत मूल नगरामध्ये स्पिकरद्वारा जनतेल आव्हानही करण्यात आले आहे. तसेच आठवडी बाजार सुद्धा एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणुन गावात बाजार समिती कडे नेहमीच्या गुजरीत आणि बसस्थानकासमोरील रस्त्यावर भाजीपाला विकण्याला परवाना दिलेल्या असुन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यांत आली आहे. तसेच किराणा दुकाणाच्या आणि औषधी दुकाणाच्या वेळासुद्धा ठरवून देण्यांत आल्या आहेत या वेळातच नागरिकांनी आपली सोय करावी असेही आव्हान नगर परिषदेतर्फे करण्यांत आले आहे.

ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या दृष्टिने अभिनंदनिय आहे तसेच मुलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी मुलच्या भाजीपाला विक्रेतत्याना हॅडग्लोव्हस वितरीत करण्यांत येत असल्याचे दिसुन येत आहे. परंतु मुल नगरामध्यच विश्रामगृह रोडवर किराणा दुकाणे आहेत. त्या दुकाणाच्या समोरqकवा गोडावूनच्या समोरच किराणा मालाचे, मिठाच्या बॅगा,तेलाचे ड्रम व इतरही किराणा साहित्य ठेवण्यांत आल्याचे दिसुन येत आहे. त्या साहित्या जवळ गावठी डुकरे , कुत्रे त्या मालाला तोंड लावतांना दिसतात, लोळतांना दिसतात ही आरोग्याच्या आणि कोरोना विषाणूच्या दृष्टिने फारच गंभिर व तेवढीच qचताजनक बाब आहे.

कारण हेच साहित्य जनतेला किराणाद्वारे विकले जातात आणि यामधुन विषाणु व रोगजंतु पसरण्याचा अधिक संभव असतो करीता नगर परिषद प्रशासनाने आणि पदाधिकाèयांनी नगर सेवकांनी सुद्धा दुकाणाच्या आणि गोडावूनच्या बाहेर ठेवलेला किरणा माल व तेलाचे ड्रॉम दुकाणाच्या आत ठेवण्याबाबत दुकाण मालकाला आदेश द्यावे. अन्यथा त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा मुलच्या जनतेकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *