चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अवैध गोवंश तस्करीत ३४ जनावरे वाहनासह पोलिसांच्या ताब्यात

एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आयशर वाहनाने अवैध गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती सावली पोलिसांना प्राप्त झाली त्याआधारे सावली पोलिसांनी नाकाबंदी करून खेडी फाटा येथे ११ जून पहाटे ४ वाजताच्या सुमारे आयशर ट्रक MH ३४ BG ९८९० या वाहनाची तपासणी केली असता ५ गायी व २९ बैल असे एकूण ३४ गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आले.
या आधारावर सावली पोलीसांनी विविध कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन व गोवंश असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून वाहन चालक इम्रान खान या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ठाणेदार आशिष बोरकर, यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार मोहन दासरवार, दर्शन लाटकर, मोहन पिदुरकर, चालक मरस्कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *