चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पहाडावरील रस्त्याची कामे अर्धवट …..

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष?……

दुचाकी चालवणेही दुरापास्त – अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची? नागरिकांचा सवाल

जिवती तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असुन कित्येक ठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने अपघातांची शक्यता वाढली असून पावसाळ्यात रस्त्यांची कामे करण्यात अडचणी निर्माण होणार असुनही सार्वजनिक बांधकाम विभाग कामांकडे तसेच कामाच्या दर्जकडे जाणीवपूर्वक व अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येतं आहे.

भेंडवी फाटा ते परमडोली दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून ह्या मार्गावर काही ठिकाणी एका बाजूने रस्त्याचे काम झाले आहे तर दुसऱ्या बाजूचे काम अजुनही अर्धवट आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालवताना कसरत करावी लागते त्यामुळे चालकांना त्रास सहन करावा लागत आहे तरीही प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येतं आहे.

रस्त्याचे काम अर्धवट असल्याने बरेचदा गिट्टीवरून दुचाकी घसरल्याने अपघात होत असून बाजूने जाणाऱ्या मोठ्या वाहनांच्या चाकांनी कित्येकवेळा गिट्टी उडून दुचाकी स्वरांना लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

एका बाजूने रोड बनल्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या एकाच बाजूने प्रवास करीत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.
चिखली पाटण या गावाजवळ काही ठिकाणी माती व गिटी टाकून ठेवले असल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या पेरणीचे दिवस चालू खते, बियाणे, शेतीची अवजारे आणण्यासाठी शेतकऱ्यांना जाणे येणे करावे लागते मात्र रस्त्यांच्या दुर्दशेमुळे तो मायबाप शेतकरी घरी सुखरूप पोहचेल का..? असा प्रश्न घरच्या कुटुंबियांना पडत असल्याने जिवती तालुक्यातील जनतेचे गडचांदूर जाणे जीवावर बेतत असल्याचे दिसून येतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *