चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पो. स्टे. खरांगना हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई, एकूण १ लाख ६ हजारावर मुद्देमाल जप्त

दिनांक १२.०५.२०२३ रोजी रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनि पो. स्टे. खरांगना हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करिता पेट्रोलिंग करत असताना आंजी येथील नमूद आरोपी इसमाचे घरी सुगंधित तंबाखू विक्री करिता असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती अन्न व औषध सुरक्षा विभागास देऊन त्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना सोबत घेऊन पंचासमक्ष नमूद आरोपीचे घरी छापा घातला असता  सुगंधीत तंबाखू विना पास परवाना मिळून आल्याने पंचा समक्ष सुगंधित तंबाखू मजा, भाग्य, बादल, जनम रिमझिम जाफराणी जर्दा नं. १) पानमसाला, पानपराग प्रीमियम, भगवती ब्रँड सुगंधित तंबाखू असा वेगवेगळ्या कंपनीचा १७५.२८ किलो वजनाचा सुगंधित तंबाखू माल एकूण किंमत १,०६,३६० /- रुपये चा माल असा एकूण जु. किं १,०६,२६०/- रु. चा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस विचारपूस केली असता सदर सुगंधित तंबाखू आरोपी महेंद्र पांडुरंग रेवतकर वय ४२ वर्षे, रा. वार्ड क्र. ३, आंजी (मोठी) ता. जि. वर्धा याने आरोपी विराग वैरागडे, मे नवप्रभात ट्रेडर्स, बुट्टीबोरी (फरार) व शुभम होलानी. रा. वर्धा. (फरार) यांचे कडून खरेदी केल्याचे व बिल नसल्याचे सांगितले वरून वरिल तीनही आरोपीतांविरुद्ध पो. स्टे. खरांगना येथे भारतीय दंड सहिता व अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्याखालील नियम व नियमन २०११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्षनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थनिक गुन्हे शाखा वर्धा यांचे प्रत्यक्ष हजेरीत पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, श्रिकांत खडसे, प्रमोद पिसे, मनिश कांबळे, पवन पन्नासे, नितीन इटकरे, प्रदिप वाघ सर्व स्थागुषा वर्धा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *