चंद्रपुर

चंद्रपूर शहरातील सर्व आड मार्ग बंद

कोरोना (कोविड-१९) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन असतांना अनेक नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करून बाहेर विनाकारण फिरायला निघतात. त्यामुळे चंद्रपूर शहरातील अंतरीक्त सर्व आड मार्ग बंद करण्यात आले आहे. शहरातील गांधी चौक, बगड खिडकी, चोर खिडकी, बिनबा गेट, तसेच मुल मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेट, शाम नगर, इंदिरा नगर, अंचलेश्वर वार्ड इत्यादी वार्ड बांबुचे कठडे बांधून सिल करण्यात आले. याचप्रमाणे शहरातील सर्वच प्रभागातील आड मार्ग बंद करण्याचे कार्य सुरूच होते.

Leave a Reply

Your email address will not be published.