चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या बाबतची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणाèया स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे ही घोषणा केली. उद्यापासूनच जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात या कामाला सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीचीचाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्यशासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून २ कोटी १८ लक्ष खर्चाची तरतूद करत या कामाला उद्यापासून सुरुवात करण्याचे निर्देश पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले. यासोबतच जिल्ह्यात आवश्यक असणाèया २० वेंटीलेटरची खरेदी सामाजिक दायित्व निधीतून करण्याचे निर्देश त्यांनी दिले.




