कोरपना (प्र.ती.) कोरपना कडून रूपापेठ येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने स्लीप झाली.यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असल्याची घटना आज बुधवार २७ मे रोजी कोरोना-आदिलाबाद मार्गावरील पार्डी येथील शिवमंदिर जवळ घडली.प्राप्त माहितीनुसार मृतक प्रकाश बापूराव जुमनाके (२२) व गंभीररीत्या जखमी सुरज दौलत सिडाम (२२)राहा. मानोली (खु.)हे दोघेही लग्ना निमित्य मानोली वरून रूपापेठ साठी निघाले होते दरम्यान पारडी जवळ त्यांची दुचाकी एम एच ३४एक्स ३७४१ हि भरधाव वेगात असल्याने वाहनावरून नियंत्रण सुटले. व हा अपघात झाला.
Related Articles
NRHM कर्मचाऱ्यांना लवकरच राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेणार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ग्वाही *आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वेधले लक्ष* चंद्रपूर – वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने NRHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी 31 मार्च पर्यंत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले होते. मात्र, 3 महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला […]
ग्रामगीतेत व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मितीची शक्ती – आ. किशोर जोरगेवार
श्री. गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञान चंद्रपूर परिवार तर्फे राष्ट्रीय ग्रामजयंती महोत्सव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी भजन आणि किर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे काम केले. संपूर्ण देशभर फिरून त्यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आपल्या लिखाणातून अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन आणि आत्मिक विकास ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले ‘ग्रामगीता’ हे काव्य रचले. त्यांनी ग्राम उन्नतीसाठी लिहिलेल्या […]
चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महिला महासभा पदग्रहण समारंभ
चंद्रपूर येथील कन्याका मंदिर देवस्थान येथे दिनांक 11-03-2023 शनिवार दुपारी 11-00 वाजता महिला महासभा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महिला सभेच्या अध्यक्ष सौ आदिती तातावर यांची अध्यक्ष पदी निवड झाली तसेच सौ वैशाली पालारपवार यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली सचिव सौ माधवी गुंडावार कोषाध्यक्ष सौ सुचिता अजय मामीडवार पदाधिकारी व […]



