![]()
चंद्रपूर येथील कन्याका मंदिर देवस्थान येथे दिनांक 11-03-2023 शनिवार दुपारी 11-00 वाजता महिला महासभा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महिला सभेच्या अध्यक्ष सौ आदिती तातावर यांची अध्यक्ष पदी निवड झाली तसेच सौ वैशाली पालारपवार यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली सचिव सौ माधवी गुंडावार कोषाध्यक्ष सौ सुचिता अजय मामीडवार पदाधिकारी व कार्यकारणी मंडळ स्थापन झाले माननीय सौ सपना ताई मुनगंटीवार यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व उद्घाटन करण्यात आले तसेच देवीची आरती व स्तवन निता उत्तरवार व ग्रुप यांनी गायले तसेच संचलनाचे सूत्र सौ अंजली बिरेवार व सौ मंजुषा भास्करवार यांनी केले. उपस्थित मान्यवर सन्माननीय अतिथी अखिल भारतीय आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा सौ माधुरी कोले आजच्या काळात गरजू स्त्रियांसाठी समाजातील महिलांसाठी मदत करणे तसेच त्यांच्या अडीअडचणीला मदतीचा हात देणे असे समाज कार्य घडवून आणणे समाजातील या महासभेचे माध्यमातून एकत्रिकरण करणे हेच याचे मुख्य उद्देश याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभा अध्यक्ष सौ सुलभा वट्टमवार यांनी आपल्या भाषणातून गरजू महिलांसाठी गृह उद्योगगिरणी उद्योगाबद्दल माहिती सांगितली. स्त्रियांना सोयीचे व्हावे यासाठी Bone Density Camp सौ अंजली दुद्दलवार यांनी आयोजित केला शंभरहून अधिक स्त्रियांनी याचा लाभ घेतला तसेच यापदग्रण सोहळ्यात वरोरा,बल्लारशा, ब्रह्मपुरी, मूल, सावली, कोरपना सात तालुक्यातून एकुण साठ भगिनींचा शपथ विधी पार पाडला सौ आदिती तातावर यांनी अध्यक्ष पर विचार मांडले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा झाले यात अदितीताई व गृप यांनी जयोस्तुतें या गाण्यावर नृत्य सादर केले इतर तालुक्यातील गृपने नृत्य सादर केले. सौ अर्चना पालारपवार यांनीआभार प्रदर्शन केले असे प्रसिद्धी प्रमुख सौ राजश्री झुलकंठीवार कळवतात.




