राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बुं. येथे दिनांक ७ आॅक्टोबर २०२० ला सकाळी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या उपसरपंच मारोती नेव्हारे व दादांजी घोडमारे यांच्यावर जगली डुक्कराने हल्ला केला यात हे दोघेही जखमी झाले असून दोघांवरही वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात वाघाची दहशत पसरली असून सोमवारी खांबाळा बिटात वाघाने मारोती पेंदाम या शेतकऱ्याचा बळी घेत परिसरातील दहावा मानव बळी घेतला आहे. या वाघाने आतापर्यंत अनेक प्राण्यांचा फडशा पाडला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून वाघाला जेरबंद करण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यातच आता जंगली डुक्कराच्या हल्ल्यातून मानव प्राण्यांना संरक्षण देण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान या नरभक्षक वाघा बरोबरच जंगली डुक्कराचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Related Articles
साडेचार लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त
Posted on Author Maha Vidarbha
चंद्रपुर :उपविभागीय पोलिस अधिकारी IPS आयुष नोपानी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी संयुक्त कारवाई करून वराडकर लेआऊट येथील आरोपी विजय गायकवाड यांच्या घरी गाडीत ठेवलेला साडेचार लाखाचा सुगंधित तंबाखू व एक लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीस अटक करून भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा […]
घरात घुसून पट्टेदार वाघाचा वयोवृद्ध महिलेवर हल्ला, महिला ठार.
Posted on Author Maha Vidarbha
तालुक्यातील चिकमारा गावात घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना 28एप्रिल गूरूवार ला रात्रौ १ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे.मृतक महिले चे नाव तुळसाबाई परसराम पेंदाम वय 89 रा.चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून हे महिला घरात झोपले असता रात्री साडेबारा वाजता एका पट्टेदार वाघाने […]



